breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

उर्से गावाजवळ दुर्घटना; काही काळ वाहतूक विस्कळीत

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. महामार्गावरील उर्से गावाजवळ हा अपघात झाल्याचे शिरगाव पोलिसांनी सांगितले. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाल्याचेही कळते. यामध्ये कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून या तिघांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.

प्रत्यक्षात काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार (एमएच 04 जेएम 5348) मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होती. उर्से गावाजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटून समोरून येणाऱ्या ट्रकला मागून धडक दिली. या भीषण अपघातात चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारच्या बोनेटसह पुढील भागाचा चक्काचूर झाला. कारची अवस्था एवढी वाईट होती की, मृतदेह आत काढण्यासाठी कारचा पत्रा कटरने कापावा लागला.

या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. शिरगाव पोलिसांनी जामची समस्या सोडवली असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. शिरगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button