breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडच्या सायन्स पार्कमध्ये ‘सुर्यग्रहण’ पाहण्याची विद्यार्थ्यांना सोय

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

दशकभराच्या प्रतीक्षेनंतर सूर्यग्रहण होत असताना शहरातील शाळांनी विद्यार्थ्यांना ते दाखवण्यासाठी सायन्स पार्कने पुढाकार घेतला आहे. सूर्यग्रहण पाहण्यासाठी गुरुवारी (दि.26) सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांना खुले करण्यात येणार आहे.

सूर्यग्रहण पाहण्यासाठी सायन्स पार्कमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, नाताळच्या सुटीमुळे काही शाळांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण पाहता यावे, यासाठी सायन्स पार्कने आवारात मोफत व्यवस्था केली आहे. टेलिस्कोपला फिल्टर लावून हे ग्रहण पाहता येणार आहे. याखेरीज ग्रहण पाहण्यासाठी तयार करण्यात आलेले खास चष्मेदेखील देण्यात येणार आहेत.

‘‘प्रशांत अलिबागकर सूर्यग्रहणासंदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना देणार आहेत’’, अशी माहिती सायन्स पार्कचे शैक्षणिक समन्वयक सुनील पोटे यांनी सांगितले. एरवी सायन्स पार्क सकाळी दहा वाजता उघडते. मात्र, गुरुवारी (ता. २६) होणाऱ्या ग्रहण सर्वांना पाहता यावे, म्हणून सकाळी आठ वाजताच ते खुले करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button