breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीत भाजी मंडईच्या कचरा कुंडीला आग

पिंपरी – पिंपरी भाजीमंडई मधील कचरा कुंडीला आग लागली. ही आग अगदी किरकोळ होती, मात्र आग लागल्यानंतर नागरिकांनी त्यामध्ये आणखी कचरा टाकला त्यामुळे आगीचा भडका उडाला. ही घटना सोमवारी (दि. 14) रात्री दहाच्या सुमारास घडली. 

पिंपरी भाजी मंडईमध्ये कचरा जमा करण्यासाठी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मंडईमधील भाजीविक्रेते आणि नागरिक कचरा टाकतात. रात्री दहाच्या सुमारास कचराकुंडीला आग लागली. ही आग काही वेळात आटोक्यात आली असती. मात्र, भाजी विक्रेत्यांनी आग लागल्यानंतर कचराकुंडीत उसाच्या चुया, कांदा-लसणाचा पाचोळा, वाळलेल्या मिरच्या आणि अन्य ज्वलनशील घटक पेटलेल्या कचराकुंडीमध्ये टाकले. त्यामुळे आगीचा मोठा भडका झाला. घटनेची माहिती अग्निशमन विभागला मिळताच संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button