breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतर्फे पोलिसांच्या ताफ्यात तीन मोबाईल सर्व्हायलेन्स व्हॅन

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी तर्फे ३ मोबाईल सर्व्हायलेन्स व्हॅन्स् (MSV) पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय यांना हस्तांतर करण्यात आले. त्याचा उद्घाटन समारंभ अतिरीक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) राजेंद्र सिंग यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधिर हिरेमठ, उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, गटनेते सचिन चिखले, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे आदी उपस्थित होते.

तीन मोबाईल सर्व्हायलेन्स व्हॅन्स् (MSV)  मधील सुविधा खालीलप्रमाणे

मोबाईल सर्व्हायलेन्स व्हॅन्स् (MSV) चे वैशिष्ट्य खालील प्रमाणे  

  • १ PTZ कॅमेरा (३६० Degree)
  • ४ व्हेईकल HD कॅमेरा
  • ८ पोर्टेबल वायरलेस HD कॅमेरा
  • २ ऑपरेटर
  • व्हिडिओ मॅनेजमेंट सॉफ्टवेअर १२ कॅमेरासाठी
  • एसी. आणि जनरेटर सेट
  • १ आठवठ्याची व्हिडोओ साठविण्याची क्षमता
  • १ लॅपटॉप
  • ५५ इंच LED टिव्ही
  • मिटिंग रुम
  • वाहनांसाठी LED लाईटस् (१२० Degree)
  • ४ स्पिकर व सायरन
  • दंगल प्रतिबंधक उपकरणे
  • युपीएस
  • स्ट्रेचर, फ्रस्टेड बॉक्स आणि फायर एक्स्टेंग्चर

पोलिस खात्यासाठी यांचा उपयोग

  • आषाढी व कार्तिकी वारीसाठी
  • आळंदी व देहुयात्रेसाठी
  • मोहरमसाठी
  • गणेशोत्सवासाठी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी
  • संप
  • निवडणुक बंदोबस्त
  • सार्वजनिक सण
  • आपतकालिन परिस्थिती
  • जमाव नियंत्रण

ही वाहने अशोक लेलँड यां कंपनीचे उत्पादित असून Mistral, Bangalore या कंपनीमार्फत आवश्यक बदल करुन घेणेत आलेला आहे. अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा पोलिस दलासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व वेगवेगळ्या आपतकालिन परिस्थितीमध्ये त्याचा फायदा होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button