breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरीत कचरा वेचक महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे काम करणा-या कचरा वेचक महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज मंगळवारी (दि. 10) सकाळी पिंपरीतील रमाबाईनगर येथे उघडकीस आली आहे.

संगीता बाळू गाडे (वय 40, रा. रमाबाई नगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता ह्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीवर काम करत होत्या. त्यांनी राहत्या घरी खांबाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. संगीता यांच्या मुलाने त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button