breaking-newsताज्या घडामोडीपुणे

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हात जोडून म्हणाले “बोल बाबा, आज काय दुपारीच चंद्रावर…”

बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या प्रत्येक भाषणात व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. आज (शनिवार) बारामतीजवळ कटफळ येथे आयोजित कार्यक्रमात ते अधिकाऱ्यांकडून ड्रोन भूमापन सर्व्हेची माहिती घेत होते. यावेळी एका दारुड्याने या ठिकाणी एन्ट्री करत थेट अजित पवार यांचे पाय पकडले. लोक दुपारीच चंद्रावर जायला लागलेत, त्यामुळे माझ्या तालुक्यात दारु धंदे नकोत अशी तंबी पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिली.

ड्रोन भूमापन सर्व्हेची माहिती पवार हे अधिकाऱ्यांकडून घेत होते. यावेळी एक तरुण गर्दीतून वाट काढत डुलतच त्यांच्याकडे आला. त्यांच्या पायाही पडला. सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी त्याला लागलीच बाजूला केले. बोल बाबा, आज काय दुपारीच चंद्रावर… काय चाललेय काय, अशी विचारणा पवार यांनी केली.

दारुड्यांमुळे गावात त्रास होत असल्याने दादा दारुधंदे बंद करायला पोलिसांना सांगा, अशी मागणी खाली बसलेल्या एका कार्यकर्त्याने केली. त्यावर पवार यांनी अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर आहेत का दौऱ्यात अशी विचारणा केली. त्यानंतर याबाबत कारवाईची तातडीने आदेश दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button