TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

पाहा Video: Rohit Pawar cooks Anda Bhurji; जेव्हा रोहित पवार स्वतः हातगाडीवर अंडा-भुर्जी बनवतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काल नवी मुंबईत विविध ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी मंगळवारी सायंकाळी नवी मुंबईचा फेरफटका मारला. यावेळी त्यांनी एका अंडा भुर्जीच्या हातगाडीवर स्वत: अंडा भुर्जी बनवली. एक आमदार रस्त्यावरील अंडा भुर्जीच्या हातगाडीवर स्वत: अंडा भुर्जी बनवतो हे पाहून सर्वच चकित झाले.

अंडा-भूर्जी बनवत असल्याचा व्हिडीओ रोहित पवारांनी ट्विटरवर शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, नवी मुंबईत विविध ठिकाणी भेट देत असताना भूक लागल्याने एके ठिकाणी सर्वांनी अंडा भुर्जीचा आस्वाद घेतला.यावेळी अंडा भुर्जी बनवतानाचं त्या युवाचं स्कील पाहून मलाही अंडा-भुर्जी बनवण्याचा मोह आवरला नाही. शेवटी त्याच्यासारखी भुर्जी मला बनवता आली नाही पण प्रयत्न केल्याचा आनंद मात्र मिळाला.

दरम्यान, रोहित पवारांनी  वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. तसेच, नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर साहेब यांचीही भेट घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button