breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हवाई दलाचे MiG-21 विमान क्रॅश, पायलट सुरक्षित

जयपूर – भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान मिग-21 दुर्घटनाग्रस्त झाले आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील सूरतगड येथे हे लढाऊ विमान क्रॅश झाले. या घटनेत पायलट सुरक्षित आहे.

वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,50,171 वर

विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं समजात पायलट विमानातून सुखरूप बाहेर येण्यास यशस्वी ठरला. हवाई दलाच्या या लढाऊ विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण केले होते. विमान दुर्घटनेनंतर गावकऱ्यांनी प्रशासनाला माहिती दिली. या अपघातानंतर कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

सरावादरम्यान, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अचानक लागलेल्या आगीमुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. दुर्घटनेदरम्यान विमानाच्या पायलटने हुशारीने स्वत:चे प्राण वाचवले. या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी देखील नोव्हेंबरमध्ये मिग- २९ के हे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान अरबी समुद्रात कोसळले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button