breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेला बुडविणा-यांची माहिती सांगा आणि 10 टक्के सवलत मिळवा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मिळकत कर चुकवून महापालिकेला गंडा घालणा-या मिळकतधारकांची कुंडली आता नागरिकच शोधून देणार आहेत. पालिकेकडे नोंदणी नसलेल्या मालमत्ताधारकांची माहिती दिल्यास संबंधित मिळकतधारकाला निवासी अथवा वाणिज्य मिळकत करात 10 टक्के सवलत मिळणार आहे. याबाबतच्या ठरावाला आज स्थायी समिती सभेत अध्यक्षा ममता गायकवाड यांनी मंजुरी दिल्याची माहिती सदस्य विलास मडिगेरी यांनी दिली.

शहरातील मिळकतधारकांनी महापालिकेला पैसे भरावे लागतात म्हणून आपल्या मिळकतींची नोंदच केलेली नाही. पालिकेला गंडा घालणा-या अशा मिळकतधारकांना शोधून काढणे अधिका-यांना अशक्य झाले आहे. कारण, लाच खाण्यासाठी अशा मिळकत धारकांना अधिकारीच पाठीशी घालत असल्याने नोंदणी नसलेल्या मालमत्तेची माहिती दडवली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी आयुक्तांसोबत चर्चा करून करबुडव्या मालमत्ता धारकांची कुंडली शोधण्याचे काम नागरिकांवर सोपविले आहे. ज्या मालमत्तांची पालिकेकडे नोंदणी नाही, अशांची इत्यंभूत माहिती देणा-याचे नाव गोपनिय ठेवले जाणार आहे. शिवाय, त्या व्यक्तीला निवासी आणि वाणिज्य मालमत्ता करात 10 टक्के सवलत दिली जाणार आहे. याबाबतचा ठराव आजच्या स्थायी समिती सभेत मंजूर केला आहे, अशी माहिती मडिगेरी यांनी दिली.

तरी, शहरातील नोंदणी नसलेल्या घरमालकांना मिळकतीची पालिकेकडे नोंद करण्यासाठी आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. ज्या मिळकतींची पालिककडे नोंद नाही, अशांवर भविष्यात पाडापाडीची कारवाई केली जाणार आहे, यावर प्रशासनाची भूमिका ठाम आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button