breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुढील आर्थिक वर्षात नागरिकांवरील करवाढीचा भार टळला  

  • आयुक्तांनी घेतला तसा निर्णय
  • स्थायीने दिली आज प्रस्तावाला मंजुरी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – ऐन निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेच्या करांमध्ये वाढ करणे अंगलट येण्याच्या भितीपोटी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी नागरिकांना अनुकूल असा निर्णय घेण्यास प्रशासनाला भाग पाडले आहे. 2019-20 मध्ये महापालिकेच्या कोणत्याही करात वाढ न करता मागच्या वर्षाप्रमाणेच कर आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही बाब नागरिकांच्या दृष्टीने दिलासादायक आहे. याबाबत ऐनवेळच्या प्रस्तावाला स्थायीने मंजुरी दिली आहे.

स्थायी अध्यक्षा ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचा विषय मंजूर केला आहे. शहरात सव्वाचार लाखांच्या आसापास मिळकती आहेत. मिळकत करापोटी पालिकेला दरवर्षी मोठे उत्पन्न प्राप्त होते. दरवर्षी हे उत्पन्न वाढविण्यावर प्रशासन भर देत आले आहे. उत्पन्न वाढीसाठी पालिकेच्या करामध्ये वाढ केली जाते. मात्र, यावर्षी कोणत्याही करात वाढ न करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ही बाब नागरिकांच्या दृष्टीने दिलासादायक मानली जात आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने पालिकेच्या करात वाढ केल्यास राजकीय फटका बसेल, या भितीपोटी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी नागरिकांच्या करात पुढील आर्थिक वर्षात कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याच्या सूचना आयुक्तांना केल्या आहेत. त्यानुसार आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी तसा प्रस्ताव आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला. या प्रस्तावाला स्थायीने मान्यता दिली आहे, अशी माहिती सदस्य विलास मडिगेरी यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button