breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

करण जोहरच्या घरी काम करणारे दोन कर्मचारी करोना पॉझिटिव्ह

मुंबई | भारतात करोना व्हायरसचा विळखा दिवसें दिवस वाढताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेते किरण कुमार करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. तर आता दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी दोघं करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. स्वतः करणने यासंबंधीची माहिती सोशल मीडियावर दिली.

करण जोहर म्हणाला की, ‘माझ्या घरी काम करणाऱ्या दोन कर्मचारी करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यांना क्वारन्टीन करण्यात आलं आहे. बीएमसीला यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. कुटुंबातील इतर सदस्य आणि लोक सुरक्षित आहेत. सर्वांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. पण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्वांना १४ दिवसांसाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.’

करण जोहर पुढे म्हणाला की, ‘सर्वांना सुरक्षित ठेवण्याच्या आमच्या आश्वासनावर आम्ही कायम आहोत. त्यांना उत्तमोत्तम उपचार दिले जातील. तसेच उपचारांदरम्यान त्यांची गैरसोय होऊ नये याची जबाबदारीही घेतली आहे. ते लवकर बरे होतील.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button