breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेतील 11 लिपिकांवर मजूर होण्याची नामुष्की, आयुक्तांची कारवाई

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर हंगामी स्वरुपात नियुक्ती देण्यात आलेल्या 11 लिपिकांवर आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी कारवाई केली आहे. या लिपिकांची नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षाच्या मुदतीत लिपिक पदासाठी आवश्यक टंकलेखन अर्हता धारण प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे आयुक्तांनी त्यांची थेट मजूर पदावर रवानगी केली आहे.

महापालिकेच्या विविध विभागातील लिपिक पदावर कार्यरत अकरा लिपिकांची नियुक्ती अनुकंपावर करण्यात आली. लिपिक पदासाठी इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी त्यांना दोन वर्षाचा कालावधी दिला होता. दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी अर्हता धारण प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे 11 लिपिकांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर कर्मचा-यांनी विभाग प्रमुखांना खुलासे केले. ते खुलासे समाधानकारक नसल्यामुळे आयुक्तांनी त्यांची लिपिक पदाची सेवा संपुष्टात आणली. त्यांची थेट गट ड मधील मजूर पदावर रवानगी केली आहे.

लिपिक अभय अनिल चौगुले, संतोष जगन्नाथ बोत्रे, सिताराम काळू मदगे, खुशाल हरीश पुरंदरे, सुशांत प्रकाश गायकवाड, मिना उमेश पालकर, संकेत विष्णु वाळंज, सनी ज्योतीबा पवार, सुरज रामदास पाटोळे, पृथ्वीराज सहादू निकाळजे, संकेत सुरेश जंगम या अकराजणांना लिपिक पदावरून पदावनत करण्यात आले आहे. यापुढे त्यांना मजूर पदावर राहून काम करावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button