breaking-newsराष्ट्रिय

उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसने मोठं थैमान घातलं आहे. अनेकांना या आजाराची लागण झाली आहे, देशातील प्रमुख राज्य महाराष्ट्र, उत्तर प्रदेश बिहारमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच उत्तरप्रदेशमधून एका मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

माहितीनुसार गुरुवारी आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह यांची तब्येत बिघडली होती, त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह यांनी स्वत: ला क्वारंटाईन करुन घेतले आहे. तसेच या आजारातून मी लवकर बरा होईल घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं म्हंटल आहे. सध्या उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचे 21 हजाराहून अधिक रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. आतापर्यंत या आजाराने 1298 जणांचा बळी घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button