breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पालघरमध्ये 14 ते 18 ऑगस्ट पर्यंत पाच दिवसांचा लॉकडाऊन

पालघर येथे येत्या 14 ते 18 ऑगस्ट पर्यंत असा पूर्णपणे पाच दिवसांचा लॉकडाऊन पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारण गेल्या तीन दिवसांपासून पालघर येथे 100 हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात दुकाने आणि मार्केटसह म्हणजेच मटण-मासे विक्रीसाठीचे मार्केट सुद्धा पुर्णपणे बंद राहणार आहे. मात्र मेडिकलची दुकाने आणि डेअरी शॉप्स सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच ही अत्यावश्यक सेवांमधील दुकाने नेहमीच्या वेळेनुसार सुरु ठेवली जाणार आहेत. संपूर्ण इंडस्ट्रियल युनिट्स ही बंद राहणार आहे. त्याचसोबत हॉटेल्समधून घरपोच डिलिव्हरी सुद्धा बंद राहणार आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त थोड्या वेळासाठी लॉकडाऊनचे निर्बंध हटवले जाणार आहेत. तर स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांना ध्वजारोहणासाठी परवानगी असणार असून त्यावेळी नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे. त्याचसोबत मास्क घालणे सुद्धा घालणे अनिवार्य असणार आहे.तसेच लॉकडाऊन दरम्यान खासगी वाहनांना रस्त्यांवरुन फिरण्यास बंदी असणार आहे. त्याचसोबत पेट्रोल पंपांवर ही या वाहनांना परवानगी नसणार आहे. सरकारी आणि अत्यावश्यक सेवासुविधांमधील गाड्यांनाच फक्त रस्त्यांवरुन फिरण्यास परवानगी असणार आहे. बँक आणि पोस्ट ऑफिसे सुद्धा सुरु राहणार असून नागरिकांना टोकन दिले जाणार आहे.

जिल्ह्यातील अन्य शहरासह वसई-विरार, डहाणू, जव्हार, मोखाडा, तालसरी, विक्रमगड आणि वाडा येथे यापूर्वी सारखेच लॉकडाऊनचे नियम लागू असणार आहे. परंतु दुकाने ऑड-इव्हन प्रमाणे सुरु करण्यात येणार आहेत. मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जीम, स्विमिंग पूल मात्र बंद राहणार आहे. वसई-विरार सुद्धा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून महापालिकेकडून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून चाचण्या सुद्धा करण्यात येत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button