breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

दाक्षिणात्य अभिनेत्री व्ही जे चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक

मुंबई – गेल्या काही काळात अनेक मोठ्या आणि प्रतिभावान लोकांच्या आत्महत्यांनी समाजमन हादरुन गेले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी साऊथमधील आयकॉनिक अभिनेत्री व्ही जे चित्रा हिने आत्महत्या केल्याचे समोर आले. अवघ्या २८ वर्षांच्या चित्राने आत्महत्या केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला असून मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. ९ डिसेंबरला हॉटेलमध्ये तिचा मृतदेह आढळला होता. आता चित्राच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. चित्राच्या आईने तिच्या पतीने आपल्या मुलीची मारहाण करुन हत्या केल्याचा आरोप केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहलावातून चित्राचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचे निष्पन्न झाले असून आर्थिक समस्यांमुळे तिने आत्महत्या केल्याची शक्यता तपासात समोर येत आहे. चित्राचा पती हेमनाथ याच्यावर तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच चित्राचं लग्न झालं होतं. काही मालिकांमध्ये तिने बोल्ड सीन दिल्याने हेमनाथ नाराज होता असं तपासात समोर आलं आहे.

‘हेमनाथला चित्राने टीव्ही मालिकेत दिलेला सीन आवडला नव्हता. ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला, त्यादिवशी त्याने दिला धक्काही दिला होता’, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून हेमनाथची चौकशी सुरू होती. चित्राचे मित्र आणि सेटवरील सहकाऱ्यांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button