breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पार्थ पवारांची ‘सत्यमेव जयते’कडे वाटचाल; चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

पुणे |महाईन्यूज|

पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात ट्वीट केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी पार्थ यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. तर पार्थ पवारांची ‘सत्यमेव जयते’कडे वाटचाल सुरू असल्याचं सूचक वक्तव्य करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी सस्पेन्स वाढवला आहे. मात्र, पार्थ यांना भाजपत प्रवेश देणार का? यावर सावध भूमिका घेत अद्याप प्रस्ताव आला नाही, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी सावध पवित्रा घेतला.

दरम्यान, पार्थ यांच्याबाबत सूचक आणि सावध बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवरही कठोर शब्दांत टीका केली. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढता येणं शक्य नाही. तसेच आरक्षण हा राज्याचा प्रश्न आहे. हे 50 वर्षे सक्रिय राजकारणात असणाऱ्या शरद पवारांना माहिती नाही. हे त्यांचं अज्ञान असं म्हणणं धाडसाचं ठरेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button