breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पाणी कपातीच संकट दूर होणार; मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव पूर्ण भरुन वाहू लागला

मुंबईत मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला असून आज म्हणजे गुरुवारी सुद्धा पावसाचा जोर कायमच आहे . उद्याही पाऊस कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबईकरांमध्ये अजूनही भीतीचं वातारण कायम आहे.

महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ रात्री १०.०० वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. २७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गतवर्षी दिनांक ३१ जुलै, २०१९ रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर २०१८ मध्‍ये दिनांक १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.

मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर म्हणजे ९ कोटी लीटर एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई व उपनगरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळं निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात आज यंदाच्या मोसमातील १२ तासांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. शहर परिसरात २१५. ८ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये १०९.९ मिलीमटर तर, पश्चिम उपनगरांमध्ये ७६. ०३ मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. मुसळधार पावसाबरोबर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याचाही वेग अधिक होता. मरीन लाइन्स परिसरात दर ताशी तब्बल १०१.४ किलोमीटर इतका वाऱ्यांचा कमाल वेग आज नोंदवण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button