breaking-newsआंतरराष्टीय

पाक पंतप्रधानांच्या लक्‍झरी कारचा होणार लिलाव

इस्लामाबाद- पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील कारच्या ताफ्याचा लिलाव करण्याचा निर्णय पाक सरकारने घेतला आहे. देशभर सुरू करण्यात आलेल्या काटकसरीच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा लिलाव पंतप्रधानांच्या निवासस्थानीच 17 सप्टेंबरला करण्यात येणार आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या कारच्या ताफ्यामध्ये 8 बीएमडब्लू, 3 एसयुव्ही (5000सीसी) आणि 2 एसयुव्ही (3000 सीसी) , 4 मर्सिडिझ बेंझ, (त्यातील 2 बुलेटप्रुफ), 16 टोयोटा कार, 4 बुलेटप्रुफ लॅन्ड क्रूझर, 1 होंडा सिव्हीक, 3 सुझुकी (2 कल्टस, 1 अपीव्ही) इतक्‍या कार आहेत. याशिवाय हिनोबसही पंतप्रधानांच्या ताफ्यात आहे. या कार 2004 पासून 2016 च्या मॉडेलच्या आहेत. ज्या कारचा लिलाव होणार आहे, त्याची तयारी करण्यात आली आहे.

आलिशान कार वापरण्याचा इरादा पंतप्रधान इम्रान खान यांनी आगोदरच सोडून दिला आहे. याशिवाय पंतप्रधानांच्या निवासस्थानाऐवजी लष्करी सचिवालयातच राहण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button