breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीय

ट्रम्प यांच्याविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव; अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष

अमेरिकन लोकशाहीसाठी हा काळा दिवस ठरला तो त्यांच्या समर्थकांनी अमेरिकन संसदेवर हल्ला केल्याचा दिवस. डोनाल्ड ट्रम्प यांचे चिथावणीखोर भाषणंच यासाठी जबाबदार आहे असा आरोप करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणण्यात आला होता.

डोनाल्ड ट्रंप यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह) संमत झाला आहे. सभागृहात 215 पेक्षा अधिक डेमोक्रेट आणि 5 रिपब्लिकन खासदारांनी याला समर्थन दिले आहे. महाभियोग चालवण्यासाठी 218 मतांची गरज होती.

महाभियोग प्रस्तावाला दुसऱ्यांदा सामोरे जाणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. आता हा प्रस्ताव संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे सिनेटमध्ये पाठवला जाणार आहे. मात्र, सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडे बहुमत नाही.

तसेच, 25व्या घटना दुरुस्तीनुसार ट्रम्प यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीला उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी नकार दिला आहे. 25वी घटना दुरुस्ती लागू करून ट्रम्प यांना आपण काढून टाकणार नाही. राज्यघटनेतील 25 वी दुरुस्ती ही अध्यक्षांना शिक्षा करण्याच्या उद्देशाने केलेली नाही, त्यामुळे ट्रम्प यांना काढून टाकण्यासाठी या तरतुदीचा वापर केल्यास चुकीचा पायंडा पडू शकतो, असे पेन्स यांनी म्हटले आहे.

अमेरिकन राष्ट्रपती कायद्यापेक्षा मोठे नाहीत. न्याय हा सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आहे, कोणत्याही शक्तिशाली व्यक्तीच्या बचावासाठी नाही, असे ट्विट अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन यांनी केलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button