breaking-newsआंतरराष्टीय

पाकला उत्तर देण्यासाठी सीमेवर तैनात होणार एअर डिफेन्स युनिट

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान बरोबर झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराची सीमारेषेजवळ एअर डिफेन्स युनिट तैनात करण्याची योजना आहे. पाकिस्तानने पुन्हा हवाई हल्ल्याचा प्रयत्न केल्यास तो उधळून लावण्याच्या रणनिती यामागे आहे. हवाई सुरक्षा यंत्रणा उभी केल्यानंतर पाकिस्तानचा हवाई हल्ल्याचा प्रयत्न सीमारेषेजवळच उधळून लावता येईल असे एएनआयने लष्करातील वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

लष्कर संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर एअर डिफेन्स युनिट तैनातीच्या निर्णयाप्रत आले आहे. जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरातमध्ये ज्या ठिकाणी एअर डिफेन्स युनिट आहेत. त्या ठिकाणांचा लष्कराने आढावा घेतल्यानंतर शत्रूचा हवाई हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावण्यासाठी एअर डिफेन्स युनिट सीमा रेषेच्या आणखी जवळ तैनात करण्याची गरज जाणवली.

ANI Digital

@ani_digital

Post-Balakot strikes, Indian Army is planning to deploy a number of its air defence units close to the border to thwart aerial threats emanating from Pakistan.

Read @ANI Story | https://www.aninews.in/news/national/general-news/post-balakot-strikes-indian-army-to-move-air-defence-units-closer-to-pakistan-border20190514142040/ 

209 people are talking about this

भारतीय लष्कराच्या या एअर डिफेन्स सिस्टिममध्ये स्वदेशी बनावटीचे आकाश क्षेपणास्त्र, रशियाच्या क्वाड्राटचा समावेश होतो. लष्कराला लवकरच डीआरडीओ आणि इस्त्रायलची संयुक्त निर्मिती असलेली एमआर-सॅम एअर डिफेन्स सिस्टिमही मिळणार आहे.

भारताने २६ फेब्रुवारीला बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. पाकिस्तानची एफ-१६ आणि जेएफ-१७ विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. त्यावेळी सुखोई आणि मिग-२१ बायसन विमानांनी पाकिस्तानचा डाव यशस्वी होऊ दिला नव्हता. या डॉगफाईटमध्ये पाकिस्तानचे एक एफ-१६ विमानही पडले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button