breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पिण्यासाठी धरणात अवघे ३.७५ टीएमसी पाणी

पुण्यात पाणी काटकसरीने वापरावे लागणार

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणीसाठा झपाटय़ाने कमी होत असून चारही धरणांत मिळून सद्य:स्थितीमध्ये ४.८० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी अवघा ३.७५ पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध होणार आहे. हे पाणी पंधरा जुलैपर्यंत पुरेल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करण्यासाठी महिन्याला सव्वा टीएमसी पाणी लागते. उपलब्ध पाणीसाठा आणि तीव्र उन्हामुळे होणारे बाष्पिभवन लक्षात घेता पाणी काटकसरीने वापरावे लागणार असल्याचेही स्पष्ट होत आहे.

खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी असल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेही एक दिवसाआड पाणीपुरवठय़ाचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र पालकमंत्री गिरीश बापट यांनी धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पुरेल, असा दावा केला होता. आवश्यकता भासल्यास धरणातील मृत पाणीसाठा (डेड स्टॉक) वापरण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. सध्या ग्रामीण भागातील शेतीसाठीचे कालव्यातून सोडण्यात येणारे आवर्तन बंद करण्यात आले आहे. त्यानंतरही जुलैपर्यंत पाणी नियोजन करणे महापालिकेपुढे आव्हानात्मक ठरणार आहे. सध्या चारही धरणात मिळून ४. ८० अब्ज घनफूट (टीएमसी) असा पाणीसाठा आहे. त्यापैकी शहराला ३.७५ टीएमसी पाणी मिळणार आहे. शहराला प्रतिदिन दोन वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी १२५० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार महिन्याला सव्वा टीएमसी पाणी आवश्यक आहे. याचबरोबर समाविष्ट गावांबरोबरच आसपासच्या पाच किलोमीटर अंतरातील गावांना नियमानुसार महापालिकेला पाणीपुरवठा करावा लागणार आहे. याशिवाय आषाढी वारीनिमित्तही काही पाणी राखीव ठेवावे लागणार आहे. या परिस्थितीत पावसाचे उशिरा आगमन झाल्यास जुलै महिन्यात पाण्याची परिस्थिती बिकट होणार आहे. त्यामुळे धरणातील पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.

  • खडकवासला साखळी प्रकल्पातील पानशेत, वरसगांव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणातील पाणीसाठा यंदा गतवर्षीपेक्षा कमी आहे.
  • गेल्या काही महिन्यांपासून शहरावर पाणीकपातीची टांगती तलवार आहे.
  • कालवा समिती आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानेही शहराच्या पाणीसाठय़ात कपात करण्याचे आदेश दिले आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button