breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवनाथडी जत्रेत ‘शेवंता’ फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा आक्षेपार्ह उल्लेख?

जनसंपर्क विभाग पुन्हा वादाच्या भोव-यात; महापाैरांनी प्रशासनाची चुक केली कबूल

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेचा जनसंपर्क विभाग सतत वादात पडू लागला आहे. महापालिकेच्या पवना जत्रेतील एका जाहिरातीवरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “रात्रीस खेळ चाले” मालिकेतील शेवंता फेम अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर यांचे हस्ते पवनाथडी जत्रेचे उद्घाटन करण्यात आले. परंतू, त्यांची निमंत्रण जाहिरात करताना त्यांच्या नावापुढे करण्यात आलेल्या उल्लेखावरुन तर्क-विर्तक चर्चा सुरु झाली आहे.

महापालिकेच्या पवनाथडी जत्रेचे जाहिरात करताना अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांचा विशेष आकर्षण असा उल्लेख केला आहे. जनसंपर्क विभागामार्फत केलेला हा उल्लेख आक्षेपार्ह आहेच, शिवाय महिलांविषयी असलेल्या विकृत मानसिकतेचं दर्शनही घडविणाराही आहे, असा आरोप होवू लागला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचं महापौर पद एक महिला भूषवत असताना देखील महिलांबाबत अशी जाहिरातबाजी करून अकलेचे तारे तोडणाऱ्या महापालिकेच्या जनसंपर्क विभागाचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, अशी प्रतिक्रिया जनसामान्य माणसात समोर येत आहे. दरम्यान या उल्लेखा बाबत अपूर्वा नेमळेकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या प्रतिक्रिया न देता निघून गेल्या.

दरम्यान, महापौर उषा ढोरे यांनी या जाहिराती बाबत आक्षेप नोंदवीत ही प्रशासनाची चूक असल्याचं म्हटलं आहे. असा उल्लेख करण्याऐवजी प्रमुख पाहुणे म्हणून उल्लेख केला असता तरीही चाललं असतं, असं म्हणत ढोरे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button