breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पवईत राहत्या घरातच वृद्धेची हत्या

मुंबई | महाईन्यूज

पवईत राहत्या घरातच ६५ वर्षांच्या वृद्धेची हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली आहे. आजारपण आणि व्यवसायात आलेल्या मंदीला कंटाळून पतीनेच तिची हत्या केल्याचा संशय आहे. त्यानुसार, पवई पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शीला लाड (६५) असे वृद्धेचे नाव होते. त्या पवईच्या तुंगा परिसरातील साकीविहार रोडवरील शिवशक्ती सोसायटीत पती अजित (७०) यांच्यासोबत राहत होत्या. पवई परिसरातील एका घरात महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा कॉल रविवारी पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, लाड यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. गळा दाबून नंतर डोक्यात अवजड वस्तूने हल्ला करत, शीला यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक अहवालात उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
शीला लाड यांच्या घरात त्यांचे पती अजित यांनी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. त्या चिठ्ठीत मी स्वत:चेदेखील बरेवाईट करून घेईन, असा उल्लेख असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यानुसार, शीला यांच्या हत्येमागे त्यांचे पती अजित यांचाच हात असल्याचा प्राथमिक संशय असून, पती पसार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button