breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

अरविंद केजरीवालांनी घेतली उपराज्यपाल अनिल बैजल यांची भेट, 16 फेब्रुवारीला घेणार सीएम पदाची शपथ

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुरकीत मोठे बहुमत मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यानिमित्त केजरीवाल यांनी बुधवारी सकाळी उपराज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली.

येत्या 16 फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानावर ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. उपराज्यपालांची भेट घेतल्यानंतर आपल्या घरी जाऊन केजरीवाल आमदारांची बैठक घेत आहेत. तत्पूर्वी आम आदमी पार्टीच्या एका नेत्याने सांगितल्याप्रमाणे, “आमदारांच्या बैठकीमध्ये सरकार स्थापनेवर चर्चा केली जाणार आहे. यासाठी पक्षाकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर सर्वच आमदारांनी एकमत होणे आवश्यक आहे.” तर दुसरीकडे, नवनिर्वाचित आमदारांनी सकाळपासून केजरीवाल यांच्या निवासस्थानी हजेरी लावण्यास सुरुवात केली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. आम आदमी पक्षाने या निवडणुकीत एकतर्फी शानदार कामगिरी करीत ६२ जागांवर विजय मिळवला. मतमोजणीपूर्वी आम्हीच सत्तेत येणार असा दावा करणाऱ्या भाजपला सलग दुसऱ्यांदा नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपला आमदारांची दोन आकडी संख्या गाठता आली नाही. भाजपचे केवळ ८ आमदार निवडून आले आहेत. २०१५ मधील निवडणुकीत भाजपला केवळ ३ जागांवर विजय मिळाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button