breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पर्यावरण दिनी सीआरएफ जवानांकडून नदी पात्रात राबविली स्वच्छता मोहीम

पिंपरी (महाईन्युज) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय राखीव पोलिस दल (सी.आर.एफ)  तळेगाव व पुणे ग्रुप केंद्राच्या वतीने सांगवी परिसरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.  जुनी सांगवी, बोपोडी याठिकाणी सहभागी झालेल्या सुमारे दोनशे जवानांनी पवना व मुळा नदीतील जलपर्णी काढुन नदी स्वच्छता कामास हातभार लावला. यात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संस्था व महापालिका प्रशासनाच्या अधिका-यांनी यात सहभाग घेत जवानांना सहकार्य केले.

शहरातील मुळा नदी आणि बोपोडी परिसरात ही मोहिम राबविण्यात आली. सकाळी सात पासून नदीकिनारा भागात दोनशे जवान दाखल झाले. सकाळी सात ते अकरा दरम्यान दोन ट्रक जलपर्णी पात्राबाहेर काढण्यात आली. श्री विरेन्द्र कुमार टोपे उपमहानिरिक्षक ग्रुप केंद्र पुणे, श्री.एच.एस.कालस कमान्डेन्ट २४२ बटालियन ग्रुप केंद्र पुणे, धिरेन्द्र वर्मा, सचिन गायकवाड उप कमान्डेन्ट,शिजी वी.एस. संतोष भोसले, आर.सी.मिना सहाय्यक कमान्डेन्ट यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण दिनानिमत्त नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजु सावळे, महापालिका ह प्रभाग आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button