breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रिय

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने आणला नवा प्लान

नवी दिल्ली – नव्या वर्षांत जिओने ग्राहकांना मोफत कॉलिंगची सुविधा सुरू केल्यानंतर भारती एअरटेलने जबरदस्त प्लान्स आणले आहेत. २४९ रुपयांना मिळणारा १.५ जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंगचा रिचार्ज आता १९९ रुपयांत करता येणार आहे. यापूर्वी १९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना १ जीबी डेटा मिळत होता. जिओला टक्कर देण्यासाठी प्लानची किंमत कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

एअरटेलची ही ऑफर काही निवडक युजर्संना दिली जात आहे. एअरटेलच्या वेबसाइटवर आंध्र प्रदेश आणि तेलंगाना, कर्नाटकमधील काही सर्कलमध्ये काही निवडक नंबर्सवर १९९ रुपयांच्या रिचार्जवर रोज १.५ जीबी डेटा दिला जात आहे. १९९ रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लानमध्ये आता २८ दिवसांसाठी रोज १.५ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण ४२ जीबी डेटा दिला जाणार आहे. याशिवाय, देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस फ्री मिळणार आहे. या रिचार्ज सोबत ग्राहकांना फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूझिक सब्सक्रिप्शन आणि एअरटेल एक्स्ट्रीम अॅपचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जात आहे.

एअरटेलच्या २४९ रुपयांच्या प्रीपेड पॅक उपलब्ध आहे. २४९ रुपयांच्या प्लानमध्ये सर्व ऑफर्स १९९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारे आहेत. यात फास्टॅग खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक आणि एक वर्षासाठी शॉ अकाडमी ऑनलाइन कोर्स उपलब्ध आहे. १९९ आणि २४९ रुपयांच्या रिचार्ज प्लानदरम्यान, एअरटेलकडे २१९ रुपयांचा पॅक सुद्धा उपलब्ध आहे. पॅकसोबत २८ दिवसांसाठी १ जीबी डेटा रोज मिळतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button