breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंताजनक.. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाने ७ हजारांचा टप्पा ओलांडला..!

पिंपरी | पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. जुलै महिन्यात दररोज ३०० ते ४०० हून अधिक पॉझिटिव्ह रूग्ण सापडत आहेत. या महामारीचा विळखा आता शहरात घट्ट झाला असून बाधित रूग्णांच्या संख्येने ७ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शहरात आज (दि.१२) सकाळी ९ वाजेपर्यंत ७०७१ बाधित रूग्णांची नोंद झाली असून दिवसेंदिवस धोका वाढत चालला आहे.

महापालिकेच्या कोरोना वॉररूममधून मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरात सध्या २८०४ अँक्टिव्ह रूग्ण असून विविध रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजपर्यंतच्या बाधित रूग्णांची संख्या ७०७१ एवढी झाली आहे. दरम्यान शहरातील १०२ रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून शहराबाहेरील ३६ जण दगावले आहेत. त्यामुळे एकूण बळींची संख्या १३८ वर पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे होणार्या रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. आजपर्यंत ४१६६ रूग्ण ‘कोरोनामुक्त’ झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाचा संसर्ग शहरातील आमदार, नगरसेवक, महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील झाला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचा मृत्यू देखील कोरोनाचा उपचार सुरू असताना झालेला आहे. या आजाराची वाढती परिस्थिती पाहता सर्वच स्तरातून शहरात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात यावा अशी मागणी केली जात होती. त्याअनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दि.१३ जुलैपासून ५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button