TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

पनवेलमध्ये आढळला पुणे येथील संजय कार्लेचा मृतदेह

पनवेल: पुण्यामधील तळेगाव दाभाडे येथे मूळ राहणा-या संजय मारुती कार्ले याचा मृतदेह मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल येथील कर्नाळा पक्षी अभयारण्यालगत एका अाॅ़डी गाडीत आढळला. संजयवर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता. संजयच्या सोन्याची बनावट नाणी विक्रीतून तो फसवणूक करत असल्याचा गुन्हा त्याच्यावर यापूर्वी दाखल होता. नूकताच तो तुरुंगातून पेराॅलवर सुटला होता. त्याच्यावर यापूर्वी मोक्का अंतर्गत पोलिसांनी कारवाई केली होती.

४५ वर्षीय कार्ले याचा मृतदेह ज्या अाॅडी गाडीत आढळला ती गाडी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता बेवारस स्थितीत महामार्गवर असल्याने ग्रामस्थांनी पोलिसांना संपर्क साधला. या अाॅडी गाडीच्या काचा आतून बंद असल्याने पोलीसांना गाडीचा दरवाजा खोलण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. नवीन पनवेल पोलीस ठाण्यात याबाबत खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून संजय याच्या छातीवर व पोटावर मारेक-यांनी गोळ्या झाडल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. या महामार्गावर सीसीटिव्ही नसल्याने पोलीसांना मारेक-यांना शोधण्यात अडथळे निर्माण होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button