TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

नेपाळच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उरणच्या जलतरणपटूने मिळवले सुवर्ण यश

उरण : नेपाळ येथे शनिवारी झालेल्या “संयुक्त भारत खेल फाउंडेशन”च्या सातव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये उरणसह रायगड जिल्ह्यातील सात स्पर्धकांनी जलतरणपटूनी विविध प्रकारात १३ सुवर्ण व १ रजत पदक पटकावत सुवर्णा पताका झलकावली आहे. देशाचे प्रतिनिधित्व करत अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेमध्ये या सातही स्पर्धकांनी आपला ठसा उमटवत जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.
संयुक्त भारत खेल फाउंडेशन यांच्यावातीने इंदौर , मध्यप्रदेश येथे घेण्यात आलेल्या सातव्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आर्यन विरेश मोडखरकर, हितेश भोईर आणि जयदीप सिंग या तीन स्पर्धकांनी प्रत्येकी तीन सुवर्ण पदकांची कमाई केली होती. तर तिघांनी यावेळी एकूण नऊ सुवर्ण पदके मिळविली होती. या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धाँसाठी या तीनही जलतरणपटुंची निवड झाली होती.

शनिवारी येथे झालेल्या “संयुक्त भारत खेल फाउंडेशच्या”सातव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जलतरण विभागातील स्पर्धेमध्ये आर्यन विरेश मोडखरकर याने वर्ष वयोगटामधील ५० मी. बटरफ्लाय आणि १०० मी. फ्रिस्टाईल या प्रकारात स्पर्धा करत दोनही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली आहे तर हितेश भोईर याने ३० वयोगटामधील ५० मी. फ्रिस्टाईल आणि २०० मी. आयएम या प्रकारामध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. जयदीप सिंग यानेही ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक आणि १०० मी. ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारामधील सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले आहे. तर सचिन उल्हास शिंगरुत दोन सुवर्ण पदके, संकेत म्हात्रे दोन सुवर्ण पदके, समर्थ नाईक एक सुवर्ण एक रजत, तर सनी टाक याने दोन सुवर्ण पदके मिळवून देशासाठी १३ सुवर्ण व १ रजत पदकांची कमाई केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तवरील या स्पर्धांमध्ये सहभागी होत, रायगड जिल्ह्यातील या सात खेळाडूचें अभिनंदन केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button