breaking-newsराष्ट्रिय

पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून नवऱ्याने स्वत:चे गुप्तांग कापले

चेन्नई | महाईन्यूज

भांडणानंतर पत्नी माहेरी निघून गेली, म्हणून हताश झालेल्या नवऱ्याने स्वत:चे गुप्तांग कापले. मंगळवारी रात्री चेन्नईच्या न्यू वॉशरमेनपेट भागात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याला मूल होत नव्हते, त्यावरुन त्यांच्यात सतत भांडणे व्हायची. नवऱ्याची दारु पिण्याची सवयही पत्नीला अजिबात आवडत नव्हती.सोमवारी रात्री भांडण झाल्यानंतर पत्नीने घटस्फोटाची मागणी केली व ती तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली.

मंगळवारी रात्री नववर्ष साजरं करण्यासाठी ती पुन्हा घरी आली होती. त्यावेळी नवरा दारुच्या नशेमध्ये होता. त्यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. पत्नी पुन्हा माहेरी निघून गेली.त्यामुळे हताश झालेले नवरा स्वयंपाक घरात गेला व चाकूने स्वत:चे गुप्तांग कापले. गंभीर जखमी झाल्याने तो आरडाओरडा करत होता. ते ऐकून शेजारी तिथे आले व त्यांनी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button