breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षापदाची निवडणूक रंजक वळणावर, पराभव दिसताच डोनाल्ड ट्रम्प बिथरले

वॉशिंग्टन – अत्यंत रंजक ठरलेल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल अद्यापही समोर आलेला नाही. मात्र, डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन हे विजयाच्या उंबरठ्यार असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मतमोजणी घ्यावी अशी मागणी केली होती. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांना चुकीच्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष पदावर दावा करु नये असं म्हटलं आहे.

अद्यापही अनेक राज्यातील मतमोजणी शिल्लक आहे. शुक्रवारी जॉर्जिया आणि पेनसिल्वेनिया महत्त्वाच्या राज्यांमध्ये जो बायडनचेच उमेदवार आघाडीवर असल्याचे समोर आले. टपाली मतांची मोजणी हा गैरप्रकार असल्याचे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा म्हटले असले, तरी त्यांच्या दुसऱ्या अध्यक्षपदाची शक्यता बऱ्यापैकी धूसर बनलेली दिसून येते.

जो बायडन यांना आपला विजय समोर स्पष्ट दिसत असल्याने त्यानी जन्मठिकाण असलेल्या विल्मिंग्टन येथे सभा घेतली होती. या ठिकाणी ते विजय जाहीर करतील असं बोललं जात होतं. मात्र अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी अद्यापही अधिकृतपणे विजयी घोषित केलेलं नाही, त्यामुळे हा नियोजित कार्यक्रम रद्द करुन दुसरा मार्ग अवलंबला जाण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1324846580147642369?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1324846580147642369%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=http%3A%2F%2Fenavakal.com%2Fus-presdident-election-2020-donald-trump-tweet-biden-should-not-wrongfully-claim-presidency%2F

एकीकडे जो बायडन यांना आपला विजय स्पष्ट दिसत असताना दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केलेला नाही. अनेकदा त्यांनी स्वत:ला विजयी म्हणून घोषितही करुन टाकलं आहे. जो बायडेन विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं मान्य करण्यास ते तयार नाही. नुकतंच त्यांनी ट्विट केलं असून जो बायडेन यांना इशारा देत म्हटलं आहे की, “जो बायडेन यांनी चुकीच्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष पदावर दावा करु नये. मीदेखील तसा दावा करु शकतो”.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र ते सिद्ध करणारा कोणताही पुरावा ते सादर करु शकलेले नाहीत.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1324855496722026498?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1324855496722026498%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=http%3A%2F%2Fenavakal.com%2Fus-presdident-election-2020-donald-trump-tweet-biden-should-not-wrongfully-claim-presidency%2F

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून एक ट्विट केलं असून आपण आघाडी घेतली असताना ती अचानक गायब झाल्याचा दावा केला आहे. “निवडणुकीच्या रात्री मला या सर्व राज्यांमध्ये आघाडी होती. पण ही आघाडी अचानक गायब होताना दिसत आहे. कदाचित आमची कायदेशीर प्रक्रिया पुढे जाईल त्याप्रमाणे आघाडी परतेल,” असं ते म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button