breaking-newsमुंबईराष्ट्रिय

पतंजलीचे किंभो अॅप प्ले स्टोरवरुन काढले कारण…

मुंबई: रामदेव बाबांच्या पतंजलीने काल किंभो हे मेसेजिंग अॅप लॉन्च केले होते. एका दिवसात जवळपास 50 हजार जणांनी हे अॅप डाऊनलोड केले होते. मात्र आता हे अॅप गुगलच्या प्ले स्टोरवरुन हटवण्यात आले आहे. किंभो अॅप डाऊनलोड केल्यानंतर अनेकांनी मोबाईन हँग होत असल्याच्या तक्रारी केल्या. त्यामुळे हे अॅप प्ले स्टोरवरुन काढून टाकण्यात आलं. मात्र ज्या व्यक्तींनी किंभो अॅप डाऊनलोड केले होते, त्यांना प्ले स्टोरवर अजूनही हे अॅप दिसत आहे.

आता गुगल प्ले स्टोरवर किंभो अॅप सर्च केल्यास ते दिसत नाही. मात्र किंभो नावाचे एक दुसरे अॅप प्ले स्टोरवर दिसत आहे. ज्यांनी हे अॅप डाऊनलोड केले, त्यांच्या फोनवर किंभो अॅप दिसते. ज्या लोकांनी हे अॅप डाऊनलोड करुन अनइन्स्टॉल केले, त्यांच्या फोनमध्येही हे अॅप दिसत आहे. पतंजलीच्या अॅपमध्ये स्क्रिनवर चॅट्स, कॉन्टॅक्ट्स आणि अॅक्टिव्हिटी असे तीन टॅब देण्यात आले होते. सर्वात वर उजव्या बाजूला गियर आयकॉनमध्ये प्रोफाईल एडिट करण्याचा पर्याय देण्यात आला होता. याशिवाय सर्चमध्ये जाऊन कॉन्टॅक्ट पाहण्याची सुविधा देण्यात आली होती. अॅपच्या प्रोफाईल पेजवर जाऊन एडिट प्रोफाईलवर जाऊन नाव आणि फोटो बदलण्याचा पर्याय देण्यात आला होता. याशिवाय फोन नंबर बदलण्याचा पर्यायही दिला गेला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button