breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: अमेरिकेत कोरोना मृत्यूचा दर वाढणार- डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेत करोना विषाणूचा कहर दोन आठवडय़ात आणखी वाढणार असून मृत्यू दर वाढून मोठय़ा संकटास तोंड द्यावे लागणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी त्यांनी आता ३० एप्रिलपर्यंत सामाजिक अंतर ठेवण्यास सांगितले आहे.

अमेरिकेत करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती १ जूनपर्यंत आटोक्यात येईल, असे त्यांनी व्हाइट हाऊस येथून घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सामाजिक अंतर ठेवण्यासह इतर मार्गदर्शक तत्त्वे आता ३० एप्रिलपर्यंत लागू राहतील असे सांगून ते म्हणाले की, करोना विषाणूचा सामना करण्यासाठी नेमलेल्या व्हाइट हाऊसच्या गटातील डॉ. देबोरा बिर्क्‍स व डॉ. अँथनी फॉसी यांच्याशी सल्लामसलत करूनच आपण सामाजिक अंतर ठेवण्यास मुदतवाढ देत आहोत. अनेक उपाय सरकारने केले असून त्यामुळे नवीन रुग्णांची संख्या कमी होईल.

प्रतिमानांच्या मदतीने जो अभ्यास करण्यात आला त्यानुसार पुढील दोन आठवडय़ात अमेरिकेतील मृत्यू दर वाढणार आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून सामाजिक अंतर राखण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येत आहेत. दरम्यान रविवारी संसर्ग असलेल्या रुग्णांची संख्या अमेरिकेत १ लाख ४० हजार झाली असून  मृतांची संख्या २५०९  झाली आहे. रविवारी १८ हजार लोकांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून एकाच दिवसात २५५ बळी गेले आहेत.

न्यूयॉर्कमध्ये साठ हजार रुग्ण असून तेथील बळी हजारावर गेले आहेत. न्यूजर्सीत १३,००० रुग्ण असून १६१ बळी गेले आहेत. अमेरिकेतील पन्नास राज्यांपैकी २० राज्यात आधी केवळ एक हजार रुग्ण होते. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, सामाजिक अंतर राखण्याच्या व इतर उपायांनी अनेक लोकांचे जीव वाचणार आहेत. आपण आतापर्यंत जे उपाय केले ते केले नसते तर २२ लाख लोक मेले असते. आपल्याला मृतांची संख्या १ लाखांच्या किंवा त्याहून खाली ठेवायची आहे. १ लाख हा सुद्धा खूप मोठा आकडा आहे.

१६ ते २२ लाख बळी जाण्याचा धोका

ट्रम्प यांनी अलीकडेच १२ एप्रिलपर्यंत सगळे काही ठीक होऊन जाईल असे म्हटले होते, पण आता त्यांनी घूमजाव केले असून सगळे सुरळीत होण्यास जून महिना उजाडेल असे म्हटले आहे. दरम्यान आता कॅलिफोर्निया व न्यूयॉर्कमध्ये स्थानिक पोलिसांनी र्निबधांचे उल्लंघन करणाऱ्यांना २०० ते ४०० डॉलर्स इतका दंड करण्यास सुरुवात केली आहे.डॉ. बिर्क्‍स व डॉ. फॉसी यांनी म्हटले आहे की, मृतांची संख्या वाढणार आहे. काही प्रतिमानानुसार जर योग्य उपाय केले नाहीत तर १६ ते २२ लाख लोक मरू शकतात, अमेरिकेतील निम्म्या लोकांना संसर्ग होऊ शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button