breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत 10 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी,योजनेतील पुढचा हप्ता 1 ऑगस्टला

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मिळतात. या योजनेत आता १० कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून सर्वाधित शेतकरी उत्तर प्रदेशातील आहेत. २ कोटी २० लाख शेतकरी उत्तर प्रदेशातील असून केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्या मते ही योजना शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यास अत्यंत महत्त्वाची ठरणारी आहे.

या योजनेतील पुढचा हप्ता १ ऑगस्ट शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही नोंदणी केली नसेल तर त्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी, अर्ज आधीच केला असेल तर अधिक माहितीसाठी PM-KISAN चा हेल्पलाइन नंबर 011-24300606 वर त्यांना संपर्क करता येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे आणि योजनेच्या यादीत त्यांच नाव आहे का हे तुम्हाला तपासायचे असेलं, तर आता हे काम देखील ऑनलाइन शक्य होणार आहे.
pmkisan.gov.in या वेबसाईटवर पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या यादीमध्ये नाव तपासता येणार आहे.

शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या ‘फार्मर कॉर्नर’ या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन ते त्यांच्या नावाची या योजनेत नोंदवणी करण्यासाठी अर्ज करू शकता… त्याचप्रमाणे जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुमची स्थिती देखील तपासून पाहू शकता.‘फार्मर कॉर्नर’वर जाऊन ‘लाभार्थी सूची’ (लाभार्थी यादी) च्या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा आणि गावाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक केल्यास सर्व यादी मिळू शकेल.

मात्र काही यादीतील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. जे शेतकरी माजी किंवा सध्या संविधानीक पदावर आहेत, माजी किंवा सध्या मंत्री, महापौर, जिल्हा पंचायत अध्यक्ष, आमदार, एमएलसी, लोकसभा किंवा राज्यसभा खासदार आहेत. त्यांचा समावेश ते शेती करत असले तरी या योजनेत केला जात नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button