breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश कराण्याचा विचार करावा’; भाजपच्या नेत्याची खुली ऑफर

काँग्रेस पक्षाचं भविष्य काय आहे?

मुंबई : मागील काही महिन्यांपासून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपत जाणार का? अशी चर्चा सुरू आहे. अशातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेस नेत्यांना खुली ऑफर दिली आहे.

अशोक चव्हाण हे एक सक्षम नेते आहेत. काँग्रेस पक्षाचं भविष्य अंधारमय आहे, त्यामुळे अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश करण्याचा विचार करावा, अशी खुली ऑफर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे.

अशोक चव्हाण सध्या ज्या पक्षात आहेत. त्या काँग्रेस पक्षाचं भविष्य काय आहे? नाशिक पदवीधर मतदारसंघात व्यक्तिगत अजेंड्यावर निवडणूक जिंकली. तिथे पक्षाचा कुठेही विचार झाला नाही. पक्षाचा विचार करण्यासाठी काँग्रेसमध्ये कुणालाही वेळ नाही. मला वाटतं की अशोक चव्हाण हे एक सक्षम नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदावर काम केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व संपूर्ण जगाने स्वीकारलं आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला सर्वांनाच आवडेल. अशोक चव्हाण यांनी याबाबत विचार करावा, असंही विखे-पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button