breaking-newsराष्ट्रिय

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्स्पायरी डेट जवळ आली’

तृणमूल काँग्रेसचे चाळीस आमदार आमच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. ज्यानंतर डेरेक ओ ब्रायन यांनी मोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आल्याचं म्हटलं आहे. तृणमूलचे ४० आमदार सोडा, तुमच्यासोबत एक सल्लागारही येणं कठीण आहे असंही ब्रायन यांनी म्हटलं आहे. तुम्ही निवडणुकीचा प्रचार करत आहात की घोडेबाजार करत आहात? तुम्ही निवडणूक प्रचारात घोडेबाजार केल्याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहोत असंही ब्रायन यांनी ठणकावलं आहे.

ANI

@ANI

Derek O’Brien, TMC on PM’s remark “40 TMC MLAs in contact with me”: Expiry Babu PM. Nobody will go with you, not even 1 councilor. Are you election campaigning or horse trading, your expiry date is near. Today, we are complaining to EC. Charging you with horse trading. (file pic)

134 people are talking about this

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय म्हटलं?
ममतादीदींचे ४० आमदार तृणमूल काँग्रेसला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील सभेत केला आहे. मोदी यांनी केलेल्या या दाव्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण, लोकसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीचे अनेक खासदार भाजपात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील सेरमपूर येथील सभेत बोलत होते. यावेळी बोलताना मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली.

यानंतर आता तृणमूलचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी या सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आल्याची टीका केली आहे. एवढंच नाही तर मोदी घोडेबाजार करत आहेत असाही आरोप केला आहे आणि मोदींविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत असंही ब्रायन यांनी म्हटलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button