breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पंतप्रधान आवासच्या अन्य प्रकल्प खर्चातही घट होण्याची शक्यता

पिंपरी ( महा ई न्यूज )-  पंतप्रधान आवास योजनेतील पिंपरी चिंचवड महापालिकेचा बो-हाडेवाडी येथील प्रकल्पाचा फेरप्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीच्या बुधवारी (दि.८) होणा-या बैठकीपुढे सादर केला आहे. त्यात केवळ प्लास्टरचा दर्जा बदलून प्रशासन व ठेकेदाराने प्रकल्पाच्या खर्चात तब्बल साडेअकरा कोटी रुपयांची घट करण्यात आली आहे. त्यामुळे या बदलामुळे आवास प्रकल्पावरून सुरू असलेला वाद आणखी वाढणार असून बो-हाडीवाडीप्रमाणे या आधीच्या च-होली व रावेत प्रकल्पांच्या खर्चातही घट होण्याची मागणी होण्याची दाट शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरात आवास प्रकल्पातून घरे बांधण्यात येत आहेत. त्या अंतर्गत बो-हाडेवाडीतील गृहप्रकल्पाच्या १२३ कोटी ७८ लाख ३७ हजार ८९४ रूपये खर्चाचे काम ठेकेदार एस. जे. कॉन्ट्रक्टर्सला देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने ठेवला होता. दरम्यान, या प्रकल्पाचे दर हे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा गृहप्रकल्पापेक्षा अधिक असल्याने कारण देत स्थायी समितीने फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले होते. बो-हाडेवाडीत पालिकेतर्फे १ हजार २८८ आणि प्राधिकरणाकडून सेक्टर क्रमांक १२ येथे २ हजार ५७२ सदनिका बांधण्यात येत आहेत. ठेकेदाराचा निविदेनुसार आणि इन्फ्रास्ट्रक्‍चर कामांचा समावेश करून पालिकेच्या प्रति सदनिका दर ९ लाख ९९ हजार ४६५ रूपये आहे. तर, प्राधिकरणाचा प्रति सदनिका दर ८ लाख २५ हजार १४८ रूपये आहे. तब्बल १ लाख ७४ हजार ३१७ रूपयांनी पालिकेचा वाढीव दर आहे. कारपेट एरिआचा प्रति चौरस फूटाचा पालिकेचा दर ३ हजार ९६ रूपये, तर प्राधिकरणाचा २ हजार ५९९ रूपये दर आहे. या तुलनेत पालिकेचा दर तब्बल ४९६ रूपयांनी जास्त होता.  पालिकेची १४ मजली इमारत असून, प्राधिकरणाची ११ मजली इमारत आहे.

प्राधिकरण इमारतीसाठी भिंतीच्या प्लास्टरसाठी वॉलकेअर पुट्टीचा समावेश आहे. तर, पालिका जिप्सम प्लास्टरचा वापर करणार आहे. तसेच, पालिकेने अ‍ॅल्युनियम खिडकी व प्राधिकरणाने एमएस खिडकी वापरली आहे. तसेच, पालिका निविदेमध्ये नामफलक, सदनिकाधारकांची एकत्रित नामफलक, लेटर बॉक्स, इमारतीचे नाव या खर्चाचा समावेश आहे. या बाबी फेरप्रस्तावामध्ये नमूद केल्या आहेत. अ‍ॅल्युनियम खिडकी कायम ठेवली जाणार आहे. मात्र, प्लास्टरचा प्रकार वगळल्यास केवळ इमारतीच्या आतील बाजूच्या फिनिशिंगमध्ये थोडासा फरक पडणार आहे. प्लास्टरचा दर्जा बदल्याने पालिकेचा प्रति चौरस फुटाचा दर घटून २ हजार ६४१ रूपये होणार आहे. तर प्रति सदनिका दर ८ लाख ५३ हजार १४३ इतका असणार आहे.  त्यातून या प्रकल्पाच्या खर्चात  ११ कोटी ३० लाख ५५ हजार ५५ रुपयांची घट झाली असून ही पालिकेची बचत होणार आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासन व ठेकेदाराने बो-हाडेवाडी प्रकल्पाचा फेरप्रस्ताव करताना खर्चात साडेअकरा कोटी रुपयांची घट केली आहे. मात्र, याधी महापालिकेने मंजूर केलेल्या च-होली आणि रावेत येथील आवास प्रकल्पांबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण, हाच नियम या प्रकल्पांना लावल्यास त्या प्रकल्पांमध्ये देखील महापालिकेच्या खर्चात बचत होऊ शकणार आहे. ही मागणी या फेरप्रस्तावावरून नव्याने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्थायी समितीच्या सुचनेनुसार ठेकेदार व अधिका-यांनी चर्चा करून प्लास्टरमध्ये बदल केला. त्यातून ही घट झाली आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला आहे. त्यांनी त्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य व केंद्र सरकारकडेही हे प्रकल्प मंजुरीसाठी पाठविले जातील. च-होली प्रकल्पाच्या कामाचे आदेश झाले असून रावेत प्रकल्पाचे आदेश अंतिम टप्प्यात आहे. आता स्थायी समितीला निर्णय घ्यायचा आहे. 
-श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिं. चिं. महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button