breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावेत

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जम्बो कोव्हिड सेंटर येथील मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. दोन दिवसांपूर्वी दाखल केलेला रूग्ण धास्ती घेऊन  त्याची परिस्थिती गंभीर होत आहे. रूग्णांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने जम्बो कोव्हिड सेंटर येथे TV स्क्रीन बसवून त्याठिकाणी भक्तीपर, मनोरंजनपर, सामाजिक सिनेमा दाखविणे त्याचबरोबर रूग्णांना योगासन, प्राणायाम यांसारख्या आसन करण्यासाठी प्रोत्साहीत करावे.

तसेच वाचणाची आवड असलेल्या रूग्णांना पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. सांस्कृतिक कार्यक्रम दाखविण्याबाबतचे निवेदन आयुक्त राजेश पाटील व अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना नगरसेवक राजू बनसोडे व पिंपरी युवा सेना विभागसंघटक निलेश हाके यांच्या वतीने देण्यात आले.

कोव्हिड सेंटरमध्ये वरीलप्रमाणे  अंमलबजावणी केल्यास मृत्यूदर कमी होऊन रूग्णांचे मनोबल वाढण्यास मदत होईल, असेही बनसोडे यांनी निवेदना म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button