breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

पंतप्रधानांसह, अमित शाह, राजनाथ सिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून देशवासियांना दिल्या हिंदी दिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसमुळेसोशल डिस्टंसिंगचे भान राखत आज संपूर्ण देशभरात हिंदी दिवस साजरा केला जात आहे. यामुळे दरवर्षी प्रमाणे देशभरात आज मोठ्या स्तरावर या दिनानिमित्त ठेवण्यात येणारे कार्यक्रम यंदा होणार नसले तरीही लोकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे.

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. ट्विटच्या माध्यमातून यांनी देशवासियांना या दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला या दिवसाच्या शुभेच्छा देत हिंदीच्या विकासासाठी अमूल्य योगदान देणा-या भाषातज्ज्ञांचे देखील अभिनंदन केलेले आहे.

तर गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी भाषेचा प्रसार करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणा-या महानुभवांना नमन करून लोकांना जास्तीत हिंदी भाषा आत्मसात करावी असे आवाहन केलेले आहे.

तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सर्व हिंदी प्रेमींना या दिनाच्या शुभेच्छा देत हिंदीसह अन्य भारतीय भाषा एक राष्ट्रीय संस्कृती आणि संस्कारांनी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे हिंदीचा विकास संपूर्ण विश्वात व्हावा अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button