breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहिला दिन

“एखादी स्त्री जेव्हा तिचं म्हणणं सर्वांसमोर मांडू पाहते, तेव्हा अशा स्त्रीकडे ‘अतिशहाणी’ म्हणून पाहिलं जातं”

‘एखादी स्त्री जेव्हा तिचं म्हणणं मांडू पाहते, सर्वांसमोर आपलं मत ठेवते. तिचे परखड विचार समाजापुढे ठेवते  थोडक्यात तिच्या भूमिकांविषयी ती ठाम असते तेव्हा अशा स्त्रियांकडे ‘अतिशहाणी’ म्हणून पाहिलं जातं. स्त्रियांनी फक्त सुंदर दिसावं, अकलेचे तारे तोडू नये, असं म्हणणाऱ्यांची  मला भयंकर चीड येते’, सविता भाभीच्या निमित्तानं  अभिनेत्री सई ताम्हणकर आपले विचार मांडले आहेत.

मराठीत पहिल्यांदाच बिकीनी घालून सई स्क्रीनवर उवतरली होती. मराठीत असं धाडस यापूर्वी कोणीही केलं नव्हतं तेव्हापासून ते अगदी सविता भाभी या सॉफ्ट पॉर्न प्रकारात मोडणाऱ्या पात्राची भूमिका करण्यापर्यंत सईचा प्रवास तमाम मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच चक्रावून टाकणारा आहे. सईनं या क्षेत्राला ‘ग्लॅमर’ दिलं आणि ‘बोल्ड’पणाही दिला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

सई ‘बिनधास्त’ आहे, चौकट मोडणारी आहे म्हणूनच ती आजच्या पिढीतील प्रेक्षकांना आवडणारी आहे. याबद्दल तिला विचारलं तर ती एकच सांगेल ‘बिनधास्त असणं किंवा बिनधास्त विचार करणं यात काहीच गुन्हा नाही. तो  तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. या बिनधास्त स्वभावाला मायेनं आपलंसं करा आणि इतरांनाही या स्वभावावर प्रेम करायला भाग पाडा’…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button