breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०,६०,३०८ वर

  • पुण्यात ४,१३४, मुंबईत २,०८५ नवे रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या १८ ते २० हजाराने वाढतेय. यासह राज्याचा एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १० लाखांच्या पुढे पोहोचला आहे. रविवारी त्यात २२ हजार ५४३ नव्या रुग्णांची भर पडली. तर ४१६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच ११ हजार ५४९ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. यासह राज्यात आतापर्यंत १० लाख ६० हजार ३०८ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यापैकी ७ लाख ४० हजार ६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या राज्यात २ लाख ९० हजार ३४४ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात २९ हजार ५३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ४ हजार १३४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता २ लाख २४ हजार ८२६ इतकी झाली आहे. तसेच काल दिवसभरात पुण्यात ८४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ३ हजार ७६६ जण कोरोनामुक्त झाले. यासह जिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा ५ हजार १४३ वर पोहोचला आहे, तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ लाख ७८ हजार ३९३ इतकी झाली आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मागील काही दिवसांपासून एक हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. रविवारी मुंबईत २ हजार ८५ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर ४१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ६९ हजार ६९३ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ८ हजार १४७ इतका झाला आहे. तर सध्या ३० हजार २७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button