breaking-newsमहाराष्ट्र

पंढरपुरात तिरंगी लढत; परिचारकांचे पारडे जड

पंढरपूर –

मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस तर्फे शिवाजी काळुंगे तर राष्ट्रवादी तर्फे काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके हे राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर युतीमध्ये हि जागा रयत क्रांती संघटनेला सोडण्यात आली असून माजी आ.सुधाकरपंत परिचारक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्यात आघाडी झाली असली तरी काँग्रेस आणि रसष्ट्र्वादीने उमेदवार जाहीर केल्याने घोळ झाला आहे. तर दुसरीकडे युतीतर्फे सुधाकरपंत परिचारक यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केला.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि रिडालोसचे भारत भालके यांच्या निवडणूक झाली. यात भालके विजयी झाले. त्यानंतर २०१४ साली काँग्रेसकडून भारत भालके,स्वाभिमानी संघटनेकडून प्रशांत परिचारक तर समाधान अवताडे यांनी सेनेकडून निवडणूक लढवली. याही निवडणुकीत भालके विजयी झाले.मात्र या निवडणुकीत आ.भालके यांनी काँग्रेसला हात दाखवला. पक्षच्या मुलाखतीला पाठ फिरवत भाजप मध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केले. अखेरीस भालके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि उमेदवारी जाहीर झाली. त्याच वेळी काँग्रेस पक्षाकडून शिवाजी काळुंगे यांचे नाव दिल्ली येथून जाहीर झाले. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची आघाडी झाली असताना इथे मात्र विरोधात अर्ज दाखल केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button