breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंजाबमध्ये नियमांचे उल्लंघन, मंदिर उघडले; कर्नाटकमध्ये सलून उघडले, दिल्ली आणि केरळमध्ये रस्त्यांवर वाहनांची वर्दळ

नवी दिल्ली | देशातील लॉकडाउन-4 जा आज पहिला दिवस आहे. केंद्र सरकारने लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवला असला तरी निर्बंध केवळ कंटेनमेंट झोनपर्यंत ठेवण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी देशतील विविध भागात याचा परिणाम पाहायला मिळत आहे.

पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये फुटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स आणि बॅग-हेल्मेटची दुकाने उघडल्याची चित्र दिसून आले. दुसरीकडे, कर्नाटकात सलून उघडण्यात आले आहेत. दिल्ली आणि केरळच्या कोचिनमध्ये रस्त्यांवर वाहनांची वर्दळ पाहण्यास मिळाली. पंजाबच्या अमृतसरमध्ये सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या विरोधात मंदिरे उघडण्यात आली आहेत. लोक येथे पुजा करण्यासाठी पोहचले. केंद्र सरकारने 31 मेपर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर बस-टॅक्सी आणि इतर प्रवासी वाहनांना परवानगी दिली आहे.

परस्पर संमतीने राज्ये आंतरराज्यीय बस देखील चालविण्यास सक्षम असतील. गृह मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले की कंटेन्ट झोनबाहेरील सर्व कामांना सूट देण्यात येणार आहे. सलून, ऑटोमोबाइल, वर्कशॉप, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे इत्यादी प्रकारची सर्व दुकाने आणि मार्केट उघडले जातील मात्र धार्मिक स्थळे, शाळा-महाविद्यालये बंद राहतील. अमृतसरमध्ये माता भद्रकाली मंदिर सोमवारी उघडण्यात आले. मंदिर उघडल्यानंतर लोक दर्शनासाठी पोहचले. मंदिरातील पुजाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले, मात्र कोणी ऐकायला तयार नव्हते. ते दर्शन करण्याची विनंती करत होते. आम्ही यावेळी सोशल डिस्टेंसिंगची काळझी घेतली. भाविकांनी लवकर यावे आणि जावे असे आम्ही ठरवले.’

पंजाबमध्ये कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त इतर ठिकाणे आजपासून उघडली जात आहेत. कर्फ्यू हटवण्यात आला आहे. सरकारी आणि खासगी कार्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. बससेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ऑटो रिक्षा आणि टॅक्सी आजपासून सरु होतील. मार्गदर्शक सूचनांनुसार दुचाकी आणि चारचाकी वाहनांना परवानगी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button