breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

पंकजा, राेहिणींचा पराभव भाजपच्याच लाेकांकडून; एकनाथ खडसेंचा ‘बाॅम्बगाेळा’

जळगाव – ‘पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यासाठी भाजपतील ‘काही लाेकांनी’ सुनियाेजितपणे धनंजय मुंडेंना ताकद पुरवली, अशा कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. या प्रकारामुळे त्या निश्चितच व्यथित आहेत. परंतु याबाबत त्यांनी माझ्याशी संवाद साधलेला नाही,’ असा गाैप्यस्फाेट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला.

पंकजा मुंडे १२ डिसेंबरला काय भूमिका मांडतात हे महत्त्वाचे आहे. गाेपीनाथगडावरील या कार्यक्रमाचे निमंत्रण मला आलेले नाही, आल्यास मी नक्की जाईन, असे सांगत खडसेंनी आपण पंकजांच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले आहेत.

पंकजांप्रमाणे माझी मुलगी राेहिणी यांचा पराभवदेखील भाजपच्याच काही लाेकांनी केला, हे मी नावानिशी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सांगितले. मात्र, त्यांची चाैकशीदेखील झाली नाही. मी स्वत: तक्रार केली असताना ही स्थिती आहे, तर पंकजांच्या भावना साहजिक असतील. पंकजांप्रमाणे माझ्याही पक्षांतराच्या वावटळी उठवल्या जात आहेत, परंतु आपण भाजपत राहू, असेही खडसेंनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button