breaking-newsआंतरराष्टीय

भारताचा हरवलेला विक्रम लँडर नासाने नाही तर भारतीय तरुणानेच शोधला

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाला भारतीय विक्रम लँडर अखेर सापडलं आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे यामध्ये भारतीय तरुणाने मुख्य भूमिका बजावली आहे. नासाच्या ऑर्बिटरला चंद्राच्या भूपृष्ठावर विक्रमचे अवशेष सापडले असल्याची माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे. नासाने चंद्रावरील साऊथ पोलवरील फोटो प्रदर्शित केले होते.

चेन्नईमधील इंजिनिअर शानमुगा सुब्रहमण्यम याने या फोटोंचं व्यवस्थित निरीक्षण करत दुर्घटनाग्रस्त झालेल्या चांद्रयान-२ च्या विक्रम लँण्डरचा ठावठिकाणा मिळवला आहे. यानंतर त्याने नासाला यासंबंधी माहिती दिली. काही वेळाने नासाने अधिकृतपणे याला दुजोरा दिला. नासाने याबद्दल शानमुगा सुब्रहमण्यम याचे आभार मानले असून कौतुकही केलं आहे.शानमुगा सुब्रहमण्यम उर्फ शान मॅकेनिकल इंजिनिअर आणि कॉम्प्यूपर प्रोगामर आहे. सध्या तो चेन्नईमधील लेनॉक्स इंडिया टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये टेक्निकल आर्किटेक्ट म्हणून काम करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button