breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल’मध्ये बालदिन उत्साहात साजरा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू जयंती आणि बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी सरस्वती पुजन करून संस्थेचे संस्थापक अरुण चाबुस्कवार यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन हा बालदिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यावेळी शाळेमध्ये वत्कृत्व स्पर्धा, काव्य वाचन, चित्रकला स्पर्धा तसेच खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.  

यावेळी सुत्रसंचालन उत्कर्षा मॅडम यांनी केले. तसेच, शिक्षिका रंजिता, रिटा आणि सचिन यांनी नेहरूंच्या जीवनाबद्दल मनोगत व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button