breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपळे गुरव मंदीर जिर्णाेध्दार समितीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

  • असंघटीत कामगार काॅंग्रेसची पोलीस आयुक्तांकडे मागणी 
  • महापालिकेच्या बांधकाम अधिका-यांवर कारवाई करा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपळे गुरव येथील नदीपात्रालगत शिव मंदिराचा सभा मंडप उभारण्याचे काम मागील कित्येक दिवसापासून सुरु होते. मात्र, मंदिराचे बांधकाम सुरु असताना अचानक सभा मंडप कोसळून तीन मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर नऊ मजूर जखमी झाले. यावेळी मजुराच्या सुरक्षेची कोणतीही दक्षता घेतली नाही म्हणून त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पिंपळे गुरव ग्रामस्थ जिर्णाेध्दार समिती आणि महापालिकेच्या बांधकाम अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड असंघटीत कामगार काॅंग्रेसकडून करण्यात आली आहे. 

यासंर्दभात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर.के.पद्नाभन यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपळे गुरव येथील नदी पात्रात अनधिकृतपणे शिव मंदीराच्या बांधकाम सुरु होते. हे काम सुरु असताना अचानकपणे सभा मंडप कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाला. त्याशिवाय नऊ कामगार गंभीर जखमी झाले. त्या मृत्यूमूखी पडलेल्या कामगारांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत केलेली नाही.

याबाबत अनधिकृत बांधकाम प्रश्नी 16 नोव्हेंबर 2018 रोजी महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना व अतिक्रमण निर्मुलन विभागाने नोटीस दिली होती. तसेच संबंधित बांधकाम काढून टाकण्याचा आदेश दिला. त्या नोटीस न जूमानता मंदिराचे बांधकाम चालूच ठेवले. महापालिकेने नोटीस देवून तीन महिने उलटूनही पुन्हा मंदिराचे बांधकाम सुुरुच राहिले होते. त्यानंतर बांधकाम विभागाने त्या मंदिराकडे दुर्लक्ष केले.

त्यामुळे शिवमंदीराचे अनधिकृतपणे बांधकाम सुरु ठेवल्याने निष्पाप मजुराचा मृत्यू झाला. त्यामुळे पिंपळे गुरव ग्रामस्थ जिर्णाेध्दार समितीवर आणि महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिका-यावर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, याशिवाय मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटूंबाना उदरनिर्वाहाकरिता प्रत्येकी 25 लाख भरपाई देण्यात यावी, तर जखमी कामगारांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्यात यावेत, या मागणीवर तात्काळ विचार न केल्यास याविषयी उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा पिंपरी चिंचवड असंघटीत कामगार काॅंग्रेसकडून करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button