breaking-newsपिंपरी / चिंचवड

न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरण सणदशीर मार्गाने तढीस नेणार – बी. जी. कोळसे-पाटील

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्युची फेरचौकशी करण्याची मागणी करूनही दाद मिळत नसल्याने अपना वतन संघटनेच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवार (दि. 7) पासून अन्नत्याग सत्यागृह सुरू करण्यात आला. या आंदोलनाला शहरातील राजकीय व सामाजिक अशा 50 संघटनांचा पाठिंबा मिळाला. या प्रकरणासाठी न्यायालयीन मार्गाने लढा उभा करण्याचे आश्वासन देऊन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे- पाटील यांनी दिले. त्यांच्या हाताने लिंबु सरबत पाजून हे उपोषण मागे घेण्यात आले.

निवृत्त न्यायधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. याप्रसंगी बोलताना त्यांनी केंद्रामध्ये असलेल्या भाजपा सरकारवर हल्ला केला. देशामध्ये सर्व लोकशाही व्यवस्थांवर सत्ताधारी पक्षांकडून अप्रत्यक्षपणे हल्ले केले जात आहेत. लोकशाही उध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे. मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करून देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सध्याचे केंद्र सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळेस त्यांनी आंदोलनकर्त्यांना न्यायमूर्ती लोया प्रकरणात स्वतः लक्ष घालून न्यायालयीन मार्गाने न्या. लोया प्रकरण तडीस नेऊ, असे अश्वासन त्यांनी दिले.

त्यानंतर हे आंदोलन थांबवण्याची कोळसे-पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना विनंती केली. अपना वतनचे “अन्नत्याग सत्याग्रह” तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी कोळसे पाटील यांच्या हस्ते संघटनेचे सिद्दीक शेख व हमीद शेख यांना लिंबू सरबत पाजून आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, राहुल डंबाळे, ऍड. मोहन अडसूळ, ऍड. किरण शिंदे, ऍड. सिकंदर शेख, राजश्री शिरवळकर, संगीत शहा, अनिता नायडू , प्रकाश पठारे , विशाल जाधव, सुरेश गायकवाड, सालार शेख, शहाबुद्दीन शेख, रौफ शेख, रशीद सय्यद, दीपक खैरनार, फारुख शेख, शिवशंकर उबाळे, तौफिक पठाण, मनोज मोरे, जावेद सौदागर, दिलीप रणपिसे, जमीर तांबोळी, संदीप साळवे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button