breaking-newsआंतरराष्टीय

नौदलाची ताकद वाढणार; लवकरच मिळणार 100 टॉरपॅडो मिसाईल

येत्या काळात नौदलाची ताकद अधिक वाढणार आहे. 100 हेवीवॅट टॉरपॅडो मिसाईल खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 2 हजार कोटी रूपयांचे टेंडर जारी केले आहे. तसेच मुंबईतील माझगाव डॉकमध्ये तयार करण्यात येत असलेल्या स्कॉर्पिअन क्षेणीच्या सहा पाणबुड्यांमध्ये हे टॉरपॅडो मिसाईल तैनात करण्यात येणार आहेत.

100 हेवीवॅट टॉरपॅडो मिसाईल खरेदी करण्यासाठी 10 दिवसांपूर्वीच एक टेंडर जारी करण्यात आले आहे. स्कॉर्पिअन क्षेणीच्या पाणबुड्यांची निर्मिती मुंबईतील माझगाव डॉकमध्ये सुरू असून त्यांना कलवरी क्लास हे नाव देण्यात आले आहे. तसेच या क्षेणीमधील पहिली पाणबुडी यापूर्वीच नौदलात दाखल करण्यात आली आहे. तसेच सध्या ती पाणबुडी ऑपरेशनल मोडमध्ये आहे. सध्या परदेशी विक्रेत्यांकडून नौदलाची मागणी पूर्ण करण्यात येणार असली, तरी त्यानंतरची मागणी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे.

डीआरडीओ पाणबुड्यांसाठी तसेच लढाऊ युद्धनौकांसाठी हेवीवेट टॉरपॅडो मिसाईलचा वापर करण्याच्या तयारीत आहे. फ्रान्स, स्वीडन, रशिया आणि जर्मनीच्या जागतिक उत्पादकांना हेवीवॅट टॉरपॅडोसाठी टेंडर जारी करण्यात आले आहे. यापूर्वी इटालियन फर्म ‘ब्लॅक शार्क टॉरपॅडो’ या कंपनीची यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु हेलिकॉप्टर घोटाळ्यातील नमेक्केनिका समुहाच्या गुंतवणुकीमुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. अरिहंत श्रेणीच्या अण्विक शक्तीने संपन्न असलेल्या पाणबुडीसाठीही सध्या टॉरपॅ़डोची आवश्यकता आहे. दरम्यान, कलवरी श्रेणीतील 5 पाणबुड्यांना येत्या पाच वर्षांमध्ये नौदलात सामिल करण्यात येणार आहे. तसेच येत्या काही महिन्यांमध्ये आयएनएस खांदेरीदेखील नौदलात सामिल होणार आहे.

डीझेल आणि वीजेवर चालणारी खंडेरी ही पाणबुडी शत्रूचा कर्दनकाळ ठरणार आहे. यामध्ये शत्रूपासून बचाव करण्यासाठी अत्याधुनिक स्टेल्थ फीचर देण्यात आली आहे. तसेच यामध्ये टॉरपॅडोव्यतिरिक्त अॅन्टी शिप मिसाईलही देण्यात येणार आहेत. या मिसाईलच्या सहाय्याने पाण्यातून किंवा पृष्ठभागावर शत्रूवर हल्ला करणे शक्य होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button