breaking-newsराष्ट्रिय

अंडे आणि कोंबडीला ‘शाकाहारी’चा दर्जा द्या, शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागणी

अंडे आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्या अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत केली आहे. अंडे शाकाहारी असते की मांसाहरी यावर अनेकदा वाद-विवाद आणि चर्चा रंगतात मात्र आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अंडे आणि कोंबडी यांना शाकाहारीचा दर्जा द्या अशी मागणी केली आहे. राज्यसभेत आयुर्वेदावर चर्चा सुरु असताना त्यांनी ही मागणी केली आहे.

काय म्हटले संजय राऊत?
मी एकदा महाराष्ट्रातल्या नंदुरबारमध्ये गेलो होतो. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे, तिथल्या काही आदिवासी बांधवांनी मला जेवणाचं ताट आणून दिलं. मी त्याला विचारलं काय आहे जेवणात? तर तो म्हटला ही कोंबडी आहे. मी म्हटलं मला कोंबडी नको, तर तो म्हटला ही आयुर्वेदीक कोंबडी आहे जी तुम्ही खाल्लीत तर तुमच्या शरीरात जर काही आजार असतील तर ते बरे होऊ शकतात असा दावाही त्याने केला. आम्ही या कोंबडीचे पालनपोषणच अशा रितीने करतो की ती आयुर्वेदीक कोंबडी म्हणूनच वाढवली आहे. आयुष मंत्रालयाने याची दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी माझ्याकडे हरयाणा येथून काही लोक आले त्यांनी आयुर्वेदीक अंडे हा शब्द प्रयोग केला. मी त्यांना विचारलं की अंडे आयुर्वेदीक कसे काय? तर त्यांनी सांगितले की आम्ही पोल्ट्रीतल्या कोंबड्यांना आयुर्वेदीक खाद्य देतो ज्यामध्ये लवंग, मुसली, तीळ अशा जिन्नसांचा समावेश आहे. हे खाणं खाल्ल्यानंतर कोंबड्या जी अंडी देतात ती शाकाहारी आणि आयुर्वेदीक असतात असाही दावा त्या शेतकऱ्यांनी केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. ज्यांना प्रोटीन्सची गरज आहे आणि मांसाहार ज्यांना करायचा नाही असेही लोक हे अंडे खाऊ शकतात असाही दावा त्यांनी केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

Rajya Sabha TV

@rajyasabhatv

Rajya Sabha MP @rautsanjay61‘s Remarks | Discussion on the working of the Ministry of AYUSHhttps://youtu.be/2gQvj2In0Gc  via @YouTube

See Rajya Sabha TV’s other Tweets

आयुष मंत्रालयाने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि हे नक्की केले पाहिजे की हे अंडे शाकाहारी आहे की मांसाहारी. देशात शाकाहार-मांसाहार यावरुन वाद सुरु आहे अशावेळी अंडे शाकाहारी की मांसाहरी हे ठरवले गेले पाहिजे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button